बेळगाव : उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दुचाकीचोरांना अटक करून त्यांच्या जवळील ७ दुचाकी जप्त केल्या आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत एकूण १,८५,००० रुपये किमतीच्या ७ दुचाकी आरोपींकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून हैदरअली मुस्लिमअली शेख (रा. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलनी, पिरनवाडी, बेळगाव) आणि मोदीन उर्फ नदीम शमशोद्दीन पोटेगार (रा. दुसरा क्रॉस, अमन नगर, न्यू गांधी नगर, बेळगाव) यांना आज अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून हिरो स्प्लेंडर २, ऍक्टिवा २, डिओ १, ऍक्सिस १ आणि यामहा एफझेड १ अशा एकूण १,८५,००० किमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या कार्रवाईत सहभाग घेतलेल्या पोलीस निरीक्षक रामण्णा बिरादार, महिला पीएसआय श्रीमती आर. पी. कदम, पोलीस कर्मचारी आय. एस. पाटील, जे. एफ. हादीमनी, ए. ची. अदनूर, एस. ए. कर्की, आय. एम. चवलगी आणि इतर सहकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी आणि डीसीपींनी कौतुक केले आहे.