Saturday, November 16, 2024

/

फ्लॅटमधील 5 लाखाच्या ऐवजावर दिवसाढवळ्या डल्ला

 belgaum

बेळगावात चोरट्यांचा हैदोस सुरूच असून दोन दिवसांपूर्वी नेहरूनगर मच्छे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे घरफोडी केल्यानंतर आज बुधवारी भर दिवसा चोरट्यांनी शहरातील आझाद गल्ली येथील एका बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून घरातील 5 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

आझाद गल्ली येथील हरचंद्र प्रजापत या व्यापाऱ्याच्या घरात हा चोरीचा प्रकार घडला. प्रजापत हे आझाद गल्लीतील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात.

हरचंद प्रजापत आणि कुटुंबीय फ्लॅटला लॉक करून बाहेर गेल्याची संधी साधताना चोरट्यांनी आज दिवसाढवळ्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा शिताफीने तोडून आत प्रवेश केला

आणि घरातील 5 लाख रुपये किमतीचा ऐवज लांबविला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून चोरट्यांचा शोध हाती घेण्यात आला आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.