Tuesday, January 28, 2025

/

लक्षवेधी ठरतंय ‘सरदार चे सरदार’ श्रद्धांजलीपर कट आउट

 belgaum

आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे औचित्य साधून बेळगावच्या तमाम क्रिकेट प्रेमींच्यावतीने एकेकाळी सरदार हायस्कूल मैदान गाजवणाऱ्या दिवंगत क्रिकेटपटूंना भव्य कटाऊटच्या माध्यमातून ‘सरदार चे सरदार’ या शीर्षकाखाली वाहण्यात आलेली भावपूर्ण श्रद्धांजली लक्षवेधी ठरत आहे.

बेळगावचे जुन्या काळापासूनचे सरदार हायस्कूल मैदान अर्थात सरदार्स मैदान खेळासाठी आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने टेनिस बॉल क्रिकेटसाठी सुप्रसिद्ध आहे. शहरातील लाखो मुले या मैदानावर क्रिकेट खेळत लहानाची मोठी झाली आहेत. यापैकी काहींनी हे मैदान आपल्या दर्जेदार खेळाद्वारे गाजविले आहे. जुन्या काळातील या मातब्बर टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंपैकी बरेच खेळाडू निधन पावल्यामुळे आज हयात नाहीत. आता बऱ्याच वर्षानंतर आमदार अनिल बेनके ट्रॉफी 2023 च्या स्वरूपात सरदार्स मैदानावर प्रथमच भव्य बक्षीस रकमेची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे औचित्य साधून सरदार मैदान गाजवलेल्या कांही नामवंत क्रिकेट खेळाडू जे आज आपल्यात नाही त्या सर्व खेळाडूंना बेळगाव क्रिकेट प्रेमींकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

आमदार अनिल बेनके करंडक 2023 क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी सध्या सरदार्स हायस्कूल मैदानावर क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी होत आहे. श्रद्धांजली वाहण्याबरोबरच क्रिकेटप्रेमींना सदर मैदानावर एकेकाळी नावलौकिक कमाविलेल्या मात्र आता अस्तित्वात नसलेल्या क्रिकेटपटूंची माहिती मिळावी हा देखील कट आउट उभारण्या मागचा आणखी एक हेतू आहे. मैदानात प्रवेशद्वाराच्या एका बाजूला हे लक्षवेधी भव्य कट आउट उभारण्यात आले असून ‘सरदार चे सरदार’ या शीर्षकाखालील या कट आउटवर सरदार्स मैदान गाजवणाऱ्या नामवंत टेनिस बॉल क्रिकेटपटूंपैकी 31 क्रिकेटपटूंची छायाचित्रासह नावे तर इतरांची फक्त नावे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कट आउटवर उजव्या बाजूला भारताचे जगप्रसिद्ध महान क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनील गावसकर यांची ‘या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला? हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला…’ ही समर्पक कविता देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.Benke cut out

 belgaum

दिवंगत क्रिकेटपटू शिवानंद जाधव, दिगंबर वालावलकर, शंकर कोलकर, राजू कागणीकर, शाम केसरकर, मनोहर पाटील, गौस रंगरेज, शाबास खान, महेश कलादगी, अक्षय बेंचन्नावर, बाळू कागणीकर, राजू सालगुडे, शंकर चौगुले, गजानन लोहार, अनिल हंडे, मुकुंद देसुरकर, अनंत सावंत, पवन पाटील, रमेश अष्टेकर, सुधीर राणे, भाऊ चव्हाण, यशवंत तोडणकर, राजू देसाई, विश्वनाथ पुराणीक, बाळू कंग्राळकर, इर्शाद मुल्ला, अशोक हुक्केरी, विलास येळ्ळूरकर, विश्वनाथ दिवटे व नितीन शंभूचे यांच्या नांव व छायाचित्रासह नारायण मुळीक, बापू खानापुरे, जयवंत तुळसकर, सुनील सावंत, विजय सुळेभावी, सुनील भोई, सुनील पै, प्रकाश बडवानाचे, नारायण पै, उदय चौगुले, अरुण चौगुले, दिलीप जाधव, सुभाष रायकर, कन्हैया दळवी, सतीश पुजारी, कुश दाभोळकर, प्रशांत हंगेरेकर, जयंत सौंदत्ती, राजू कंग्राळकर, सुनील घेवारी, बापू सांबरेकर, लक्ष्मण इंगोले, उमेश मुतगेकर, इजाज नालबंद, गुरुराज एनपी व संतोष राऊत यांची नावे कट आउटवर छापण्यात आली आहेत. या खेरीज नजरचुकीने एखाद्या खेळाडूचे नाव राहून गेले असल्यास दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे.

अशाप्रकारे कट आउट माध्यमातून आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा हा बेळगावातील बहुदा पहिलाच प्रकार असावा. दिवंगत मातब्बर क्रिकेटपटूंबद्दलची आपली तीव्र भावना व प्रेम व्यक्त करण्याची राजू घुमते यांच्यासह शहरातील तमाम क्रिकेटप्रेमींची ही अभिनव पद्धत सध्या सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.