कित्तूर राणी चन्नम्मा मुलींच्या निवासी सैनिक शाळेची विद्यार्थिनी तनिष्का एम. ठाकूर हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या प्रजासत्ताक दिन संचलन -2023 साठी अभिनंदन निवड झाली आहे.
कित्तूर राणी चन्नम्मा मुलींच्या निवासी सैनिक शाळेमध्ये इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेणारी तनिष्का एम. ठाकूर ही 5 कर्नाटका गर्ल्स बटालियन एनसीसी धारवाडची ज्युनिअर विंग कॅडेट आहे.
तिची नवी दिल्ली येथे येत्या 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी (रिपब्लिक डे परेड) निवड झाल्याबद्दल केआरसीएमसी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डी. बी. इनामदार यांनी खास अभिनंदन केले आहे.
त्याचप्रमाणे सदस्य सचिव महांतेश कौजलगी यांनी तनिष्काच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला असून शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकवर्गाने तिचे अभिनंदन केले आहे.