Monday, December 23, 2024

/

सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंचे सुयश

 belgaum

स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी चिवला बीच, मालवण येथे नुकत्याच पार पडलेल्या 12 व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धा -2022 मध्ये स्पृहणीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या अनिश पै, वेदांत मिसाळे आणि पाखी हलगेकर यांनी आपापल्या गटातील सर्वात वेगवान जलतरणपटू होण्याचा सन्मान मिळविला.

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या सदर सागरी जलतरण स्पर्धेच्या प्रौढांच्या विभागात रूपा कापाडिया, प्रसाद परमाज रोहन हरगुडे, प्रतीक वेर्णेकर, इंद्रजीत हलगेकर, मेघाराणी बी. एम., श्रीकांत देसाई व कौशिक पंडित यांनी आपापल्या गटातून ही समुद्र जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.

सदर स्पर्धेत बेळगाव स्विमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी मिळविलेले यश पुढीलप्रमाणे आहे. पाखी हलगेकर (स्पेशल ग्रुप) -500 मी. जलतरण सुवर्ण पदक व वेगवान जलतरणपटू ट्रॉफी, वेदांत मिसाळे (मुले गट 1) -1 कि.मी. जलतरण सुवर्ण पदक व वेगवान जलतरणपटू ट्रॉफी, अनिश पै (मुले गट 2) -1 कि.मी. जलतरण सुवर्ण पदक व वेगवान जलतरणपटू ट्रॉफी,

सिमरन गोंडाळकर (मुली गट 5) -1 कि.मी. सुवर्ण पदक, शरणया कुंबार (मुली गट 6) -1 कि.मी. सुवर्ण पदक, अनन्या पै. (मुली गट 3) -3 कि.मी. रौप्य पदक, रूपा कापाडिया (महिला गट 8) -3 कि.मी. रौप्य पदक, सुमित मुतगेकर (मुले गट 5) -1 कि.मी. कांस्य पदक, इंद्रजीत हलगेकर (पुरुष गट 7) -3 कि.मी. चौथा क्रमांक,Sports swimming

मेघाराणी बी. एम. (महिला गट 7) -3 कि.मी. पाचवा क्रमांक, श्रीकांत देसाई (मुले गट 10) -1 कि.मी. पाचवा क्रमांक, अहिका हलगेकर (मुली गट 1) -1 कि.मी. सातवा क्रमांक, अथर्व राजगोळकर (मुले गट 1) -1 कि.मी. सातवा क्रमांक.

मालवण येथील सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे वरील सर्व जलतरणपटू शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात. त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

त्याचप्रमाणे या सर्वांना केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हंबरवाडी, रो. अविनाश पोतदार, माणिक कापडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.