बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती तालुक्यातील गर्ल होसूर परिसरात खेळत असलेल्या दोन मुलांचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ च्या दरम्यान घडली आहे.
सौंदत्ती तालुक्यातील गर्लहोसूर येथे वाल्मिकी भवन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी पाणी संकलनासाठी टाकीची व्यवस्था करण्यात आली असून या टाकीजवळ खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांचा टाकीत पडून बुडून मृत्यू झाला आहे.
श्लोक शंभुलिंगप्पा गुडी आणि चिदानंद प्रकाश साळुंखे अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. प्रगती पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक खाजगी नर्सरी मध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली.