Monday, November 18, 2024

/

बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जिल्हा क्रीडांगणावर आज बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री गोविद कारजोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवर आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी आपल्या भाषणात बोलताना पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील लढवय्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अतुलनीय आहे. राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा ते गंगाधरराव देशपांडे यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी या भूमीवर बलिदान दिले.

सामाजिक न्याय, समता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या सीमेवर असणारा कर्नाटकातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. भाषिक विविधता असूनही एकतेसाठी झटणाऱ्या बेळगावकरांचे आपण अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक लोकप्रिय कार्यक्रम आखले आहेत, ज्यामध्ये सिंचन सुविधेचा विस्तार, कोविड, पूर, आर्थिक मंदी यासह अनेक आव्हानांना तोंड देण्यात सरकारने यश मिळविले आहे. कोविड नियंत्रणासाठी खबरदारी आणि उपाययोजना करून संपूर्ण देशासमोर आदर्श ठेवला आहे.Republic day

याशिवाय नाविन्यपूर्ण उद्योगांची स्थापना, औद्योगिक सुविधांचा विस्तार, भांडवली गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्मिती आणि जी.एस.टी. संकलनात कर्नाटक राज्य आघाडीवर असल्याचे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील 13 नवीन सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. या भागातील जनतेचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न असलेल्या कळसा-भांडुरा नाला प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, लवकरात लवकर कामाची अंमलबजावणी सुरू करण्याचा मानस आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

सीमावर्ती जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने अनेक कार्यक्रम आखले आहेत आणि या कार्यक्रमांची अंमलबजावणी देखील टप्प्याटप्प्याने होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.