Saturday, November 16, 2024

/

रायगड सह महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटर सरदार मैदानावर

 belgaum

आमदार अनिल बेनके करंडक अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवारी सरदार्स मैदानावर उतरलेल्या एका संघाचे नांव जरी एवायएम बी अनगोळ असले तरी या संघातील सर्व 11 खेळाडू रायगड व मुंबई येथील आहेत.

या पाहुण्या संघातील खेळाडूंनी आज उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविताना स्पर्धेचा पहिला सामना जिंकत दणक्यात सुरुवात केली असून उपस्थित क्रिकेट शौकिनांची मने जिंकली आहेत.

एवायएम बी अनगोळ असं जरी नाव असलं तरी हा संपूर्ण संघ रायगडचा आहे. या संघाने आमदार अनिल बेनके करंडक अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील आजचा आपला एसजी स्पोर्ट्स संघाविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे.

सदर संघाने रायगडसह मुंबई व गोवा येथील स्पर्धा गाजविल्या आहेत. यंदा हा संघ प्रथमच बेळगावच्या सरदार मैदानावर खेळत असून येथील अनुभव अतिशय वेगळा आणि संस्मरणीय असल्याचे या संघातील खेळाडूंनी सांगितले. रायगड, मुंबई येथे आतापर्यंत आपण मर्यादित पाच ते सहा षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळत आलो असून बेळगावातील या मर्यादित 10 षटकांच्या स्पर्धेचा अनुभव आपल्यासाठी नवीन व वेगळा असल्याचे त्यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.

बेनके ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा पहिला सामना जिंकून दणक्यात सुरुवात करणाऱ्या एवायएम बी अनगोळ संघातील स्टार खेळाडूंपैकी एक असलेल्या रायगडच्या अमित नाईक याने आपण व आपले संघ सहकारी बेळगावात आज पहिल्यांदाच क्रिकेट स्पर्धा खेळत असल्याचे सांगितले.

स्वतः फलंदाज असणाऱ्या अमित याने आपल्या संघातील सुमित डोंगरे, करण मडवी, प्रथमेश म्हात्रे वगैरे सर्वच खेळाडू मातब्बर असल्याचे स्पष्ट केले. तसेच रायगड, मुंबईसह महाराष्ट्रातील आणि गोवा येथील स्पर्धा आमच्या संघाने गाजविल्या असून अलीकडे गोव्यामध्ये झालेली एसपीएल स्पर्धा आम्ही जिंकली आहे, अशी माहिती अमित नाईक याने बेळगाव लाईव्हला दिली.Raigad tennis cricketer

एवायएम बी अनगोळचा दुसरा एक स्टार खेळाडू सलामीचा फलंदाज सुमित डोंगरे याने आपण बेळगावात प्रथमच खेळत असल्याचे सांगून आमदार अनिल बेनके करंडक क्रिकेट स्पर्धेच्या नियोजनबद्ध उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रशंसोद्गार काढले.

तसेच 10 षटकांची क्रिकेट स्पर्धा आपण प्रथमच खेळत असून यापूर्वी रायगड व मुंबई येथे आम्ही आजपर्यंत मर्यादित 5 ते 6 षटकांच्या क्रिकेट स्पर्धा खेळत आलो आहोत. त्यामुळे बेळगावच्या या स्पर्धेचा अनुभव आमच्यासाठी वेगळा आहे, असे डोंगरे याने सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.