देशात स्वच्छतेला देखील महत्त्व दिले जात असताना बेळगावात कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांकडूनच सध्या रस्त्यावर अस्वच्छता निर्माण केली जात आहे. खानापूर रोड, कॅम्प या मार्गावर आज सकाळी असाच प्रकार घडला.
कचरा वाहतूक करणाऱ्या टिप्पर मधील तुडुंब भरलेला कचरा विखरून पडत गेल्यामुळे या रस्त्यावर अस्वच्छता निर्माण झाली होती. मात्र तेथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
तेंव्हा त्यांनी आपले वाहन थांबवून स्वतः रस्त्यावर विखुरलेला कचरा गोळा करून कचरा कुंडात टाकला. या कृतीद्वारे स्वच्छतेबाबत फक्त गप्पा मारून उपयोग नाही तर
आपण स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहिले पाहिजे, तरच आपला परिसर स्वच्छ राहील हेच सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी दाखवून दिले आहे.