Saturday, December 21, 2024

/

दुसरे मराठी साहित्य संमेलन : अध्यक्षपदी प्रा. प्रवीण बांदेकर

 belgaum

प्रगतशील लेखक संघ बेळगावच्यावतीने येत्या शनिवार दि. 28 आणि रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी आयोजित दुसऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित प्रा. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांची तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ उद्योजक शिक्षणप्रेमी सुभाष ओऊळकर यांची निवड करण्यात आली आहे.

प्रगतशील लेखक संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सदर निवडीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य आनंद मेणसे हे होते. दुसरे मराठी साहित्य संमेलन मराठी विद्यानिकेतनच्या प्रांगणात होणार असून या संपूर्ण परिसराचे ‘म. फुले साहित्य नगरी’ असे नामकरण करण्यात आले आहे. यंदाचे वर्ष हे सत्यशोधक समाजाचे 150 वे वर्ष असून महात्मा गांधी यांच्या बलिदानाला 75 वर्षे होत आहेत. यामुळे हीच साहित्य संमेलनाची मध्यवर्तीय संकल्पना असणार आहे.

व्याख्याने व परिसंवाद याच विषयाला अनुसरून असतील. पहिल्या दिवशी शनिवारी 28 रोजी सायंकाळी 4 वाजता कवी संमेलनाने संमेलनाची सुरुवात होणार आहे. कवी संमेलनास ज्येष्ठ कवी चंद्रकांत पोतदार आणि प्रसिद्ध गझलकार व कवी प्रसाद कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर रविवारी 29 रोजी सकाळी 10 वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल.

उद्घाटनावेळी अध्यक्षीय भाषणानंतर ‘गांधी का मरत नाही’ या विषयावर म. गांधी अभ्यास केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या डॉ. भारती पाटील यांचे विशेष व्याख्यान होईल. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ लेखक प्रा. जी. के. ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सत्यशोधक चळवळीची प्रस्तुतता’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.

या परिसंवादामध्ये डॉ. डी. एम. पाटील (गडहिंग्लज) व प्रसाद कुलकर्णी (इचलकरंजी) आपले विचार मांडणार आहेत. चौथ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षण समन्वयक नीला आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.