बेळगाव : दरवर्षी श्री क्षेत्र सौंदत्ती येथे शाकंभरी पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त जाणारे रेणुकादेवी भक्त बेळगावमध्ये परतल्यानंतर एका ठिकाणी एकत्रित येऊन तिथे पडली पूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आपापल्या घरी जातात.
नावगोबाची यात्रा म्हणून प्रसिद्ध असणार हि यात्रा दरवर्षी मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेत पार पडते. मात्र आता त्या ठिकाणी नवे बसस्थानक बांधण्यात आल्याने हि यात्रा यंदा छ. शिवाजी नगर नगर नजीक असलेल्या पेट्रोल पंप समोरील जागेत भरणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम सुरु झाल्यानंतर शहर देवस्थान समितीने परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांची यासंदर्भात चर्चा केली होती. याचप्रमाणे बेंगळुरू मधील अधिकाऱ्यांची भेट घेऊन इतर ठिकाणी नावगोबाची यात्रा भरविण्यासंदर्भात सूचना केली होती.
यानुसार गदगेसाठी २ गुंठे जागा मंजूर करण्यात आली असून या परिसरात असलेल्या खुल्या जागेत नावगोबाची यात्रा भरविण्याची मंजुरीही देण्यात आली आहे.
१० जानेवारी रोजी हि यात्रा या परिसरात भरविण्यात येणार असून आज आमदार अनिल बेनके, शहर देवस्थान समिती अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर यासह विविध मान्यवर आणि डेपो अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यात्रा पार पडल्यानंतर सदर जागा देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात येणार असून याबाबतची रीतसर प्रक्रियाही होणार आहे. हि यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यात यावी, असे आवाहन आम. अनिल बेनके यांनी केले.