स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र आता कांही ठिकाणी जमिनीबाहेर धोकादायकरित्या डोकवणाऱ्या या वीज वाहिन्यांकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र त्या व्यवस्थित बुजवण्यात आल्या नसल्यामुळे कांही वर्दळीच्या ठिकाणी या वीज वाहिन्या धोकादायकरित्या जमिनीबाहेर डोकावू लागल्या आहेत. वाहनांची ये -जा आणि ऊन -पावसामुळे या वीज वाहिन्यांवरील संरक्षक आवरण (कोटिंग) नष्ट होऊ लागले आहे.
बेळगांव शहरात बऱ्याच ठिकाणी हा प्रकार निदर्शनास येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी या पद्धतीने उघड्यावर पडलेल्या या वीज वाहिन्या सर्वांसाठी विशेष करून पादचाऱ्यांसाठी धोकादायक आहेत.
तेंव्हा मृत्यूचा सापळा बनू पाहणाऱ्या या वीज वाहिन्यांकडे प्रशासनासह स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक -अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी केली आहे.
धोकादायक खुल्या विद्युत वायरकडे लक्ष देण्याची मागणी pic.twitter.com/aeRHfG5pd3
— Belgaumlive (@belgaumlive) January 20, 2023