बेळगाव लाईव्ह: गेल्या अनेक दिवसांपासून महिलांसाठी विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अनिल बेनके आणि परिवहन मंडळाकडे मागणी करण्यात आली होती.
इनरव्हील क्लब त्याचप्रमाणे सौरभ सावंत, संतोष दरेकर, अवधूत तिडवेकर आदींच्या वतीने यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
बेळगावमध्ये महिला वर्गासाठी पिंक बस उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके आणि परिवहन मंडळाचे विभागीय अधिकारी पी. वाय. नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
या मागणीला अनुसरून प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने बेळगाव मध्ये पिंक बस ला सुरुवात करण्यात आली आहे. आज पासून संपूर्ण बेळगाव मध्ये महिलांसाठी विशेष असणाऱ्या पिंक बस धावणार आहेत . या बस सेवेचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा, असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले आहे.
भाजपचे कार्यकर्ते सौरभ सावंत यांनी परिवहन मंत्री श्रीरामलू यांच्याकडे देखील पिंक बससेवेसाठी पाठपुरावा केला होता.
महिलांसाठी पिंक बस सेवेला बेळगावात सुरुवात pic.twitter.com/GXXr3Z6PA7
— Belgaumlive (@belgaumlive) January 26, 2023