Sunday, January 5, 2025

/

बेळगाव देवस्थान कमिटीकडे ‘ती’ जागा सुपूर्द करण्याची सूचना

 belgaum

दरवर्षी मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेत पार पडणारी श्री नागोबाची यात्रा यंदा छ. शिवाजीनगरनजीक असलेल्या पेट्रोल पंपा समोरील खुल्या जागेत भरणार आहे. लक्ष्मी मैदानाची सदर जागा कागदोपत्री अधिकृतरित्या बेळगाव देवस्थान कमिटीच्या नावावर करण्याची सूचना संरक्षण खात्याने केली असून त्या पत्राची प्रत आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज देवस्थान कमिटीकडे सुपूर्द केली.

दरवर्षी श्रीक्षेत्र सौंदत्ती येथे शाकंभरी पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त जाणारे श्री रेणुका देवी भक्त बेळगावमध्ये परतल्यानंतर एका ठिकाणी एकत्रित येऊन तिथे पडली पूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आपापल्या घरी जातात. श्री नावगोबाची यात्रा म्हणून प्रसिद्ध असणारी ही यात्रा दरवर्षी मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेत पार पडत होती.

मात्र आता त्या ठिकाणी नवे बस स्थानक बांधण्यात आल्याने ही यात्रा उद्या मंगळवार दि 10 जानेवारी रोजी छ. शिवाजीनगर नजीक असलेल्या पेट्रोल पंपा समोरील खुल्या जागेत भरणार आहे.

गेल्या 100 वर्षांपूर्वीपासून जुन्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी यात्रा भरवली जात होती. बेळगाव देवस्थान कमिटी व केएसआरटीसी यांच्यात एक अलिखित करारानुसार सदर जागा यात्रोत्सवासाठी उपलब्ध केली जात होती. मात्र आता नव्या बस स्थानकामुळे ती जागा नाहीशी झाली आहे. सदर 34 गुंठे जागा ही संरक्षण दलाच्या मालकीची असल्यामुळे केएसआरटीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी यांची बेंगलोर येथे चर्चा झाली.

या चर्चेअंती केएसआरटीसीला शिवाजीनगर समोरील पर्यायी जागा देण्याचे ठरले. या जागेतील लक्ष्मी मैदानाची दोन गुंठे जागा बेळगाव देवस्थान व यात्रोत्सव कमिटीसाठी खुली ठेवण्याचा ठराव देखील केएसआरटीसीने संमत केला आहे. दरम्यान बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नामुळे आता संबंधित लक्ष्मी मैदानाची खुली जागा अधिकृतरित्या कागदोपत्री बेळगाव देवस्थान कमिटीच्या नावावर होणार आहे. संरक्षण खात्याच्यावतीने कर्नाटक सर्कलचे डिफेन्स इस्टेट ऑफिसर बी. अजित रेड्डी यांनी एका पत्राद्वारे जागा हस्तांतराची प्रक्रिया पार पाडण्याची सूचना आमदार ॲड. अनिल बेनके यांना केली आहे.Navgoba yatra

योगायोगाने उद्या सौंदत्ती यल्लमा यात्रोत्सव आटोपून येणाऱ्या भाविकांची श्री नावगोबा यात्रा असल्यामुळे आज सोमवारी आमदार बेनके यांनी बेळगाव देवस्थान कमिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना लक्ष्मी मैदान येथे बोलावून घेऊन त्यांना संरक्षण खात्याकडून आलेल्या पत्राची माहिती दिली. तसेच त्या पत्राची प्रत देवस्थान कमिटीकडे सुपूर्द केली.

त्याचप्रमाणे लक्ष्मी मैदानाच्या दोन गुंठे जागे संदर्भातील कागदपत्रे लवकरच देवस्थान कमिटीकडे सुपूर्द केली जातील असे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी बेळगाव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील, उपाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, राहुल मुचंडी,  प्रा.आनंद आपटेकर वसंत हलगेकर, परशराम माळी, सुनील जाधव
परशराम जाधव, राजू हलगेकर आदींसह श्री यल्लमा देवीचे सर्व पुजारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.