Wednesday, November 27, 2024

/

खानापूर बस आगार व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांचा भाजप नेत्यावर हल्ला

 belgaum

अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाब विचारणारे भाजप नेते अनंत पाटील यांच्यावर बस आगार व्यवस्थापक आणि बस चालक -वाहकांनी हल्ला चढवून मारहाण केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी खानापूर बस स्थानकाच्या ठिकाणी घडली.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की खानापूर येथील भाजप नेते अनंत पाटील आज नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक साठी निघाले होते त्यावेळी त्यांना बस स्थानकाच्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींचा समूह बराच काळ बसच्या प्रतीक्षेत थांबून असल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्यांनी चौकशी केली असता शाळा -कॉलेजेसाठी जाण्यास एकही बस वेळेवर येत नसल्याची तक्रार विद्यार्थी विद्यार्थिनींनी केली.

त्यावर अनंत पाटील यांनी खानापूर बस आगाराचे व्यवस्थापक महेश तिरकंवार यांच्याकडे सहज विचारणा केली असता. त्यांनी अनिमित बस सेवेचे कारण सांगण्याऐवजी अचानक आक्रमक पवित्रा घेऊन अनंत पाटील यांच्यावर हल्ला चढविला. तिरकंवार यांना साथ देताना उपस्थित बसवाहक आणि चालकांनी देखील पाटील यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली.Bus depot manage

याप्रकरणी अनंत पाटील यांनी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून खानापूर बस आगार व्यवस्थापक आणि संबंधित चालक व वाहकावर कारवाईची मागणी केली आहे.

भाजप नेते अनंत पाटील यांना या पद्धतीने मारहाण झाल्यामुळे आता खानापूर भाजप याबाबतीत भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे सदर घटनेचा निषेधही केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.