बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज शनिवारी सकाळी किल्ला येथील श्री दुर्गादेवी मंदिरानजीक खंदका शेजारील खुल्या जागेची पाहणी केली.
सदर पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा पालक मंत्र्यांसमवेत बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.
किल्ला जवळ बेळगाव जिल्हा गंगामास्थर(कोळी) समाज श्री अंबिगर चौडय्या जयंती निम्मित शोभायात्रा काढण्यात आली त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.
बेळगाव भुईकोट किल्ल्याच्या खंदकाला लागून असलेल्या खुल्या जागेत बेंगलोरच्या धर्तीवर बेळगाव येथे फ्रीडम पार्क भरण्याचा प्रस्ताव आहे. त्या अनुषंगाने आजचा हा पाहणी दौरा करण्यात आला.
सदर खुल्या जागेत फ्रीडम पार्क उभारण्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना या ठिकाणी आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आजच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी बोलताना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.