कोरोनाच्या महामारीनंतर बहुचर्चित एकांकिका स्पर्धा आजपासून सुरू होत आहेत.एकूण 4 बालनाट्ये व 14 निवडक संघामध्ये 9 व 10 रोजी येथील लोकमान्य रंगमंदीरात या संपन्न होणार आहेत.नाट्यरसिक व तरुणाईमध्ये या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण असून एकंदरीत स्पर्धेला भव्य प्रतिसाद मिळणार आहे.
इतर बऱ्याच स्पर्धामध्ये बक्षिसे पटकविलेल्या निवडक संघामध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये
वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकीत दिग्गज संघनी स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.दर्जेदार सादरीकरणामुळे नाट्य रसिकांना नाट्यपर्वणीच लाभणार आहे.
पारदर्शक स्पर्धा म्हणून या स्पर्धांकडे पाहिले जाते.यंदा देखील दिग्गज परिक्षक या स्पर्धेसाठी येणार असून त्यांचा थोडक्यात परिचय खलील प्रमाणे…
देविदास शंकर आमोणकर.गोवा
हे अनेक वर्षे नाट्यक्षेत्रात असून त्यांना कला अकादमीचा रंगसन्मान हा पुरस्कार मिळाला आहे.तसेच गोवा शासन युवा सृजन पुरस्कार मिळाला आहे.
‘संहिता ते सादरीकरण ‘ या विषयावर ते ‘प्रत्यक्ष रंगमंच’तर्फे अनोख्या नाट्यकार्यशाळेचे प्रणेते आहेत.
गोमंतक मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भुषवलेले आहे.
रुद्रेश्वर,निसर्गरंग सांस्कृतिक मांड,संस्कार भारती,या संस्थांचे ते संस्थापक आहेत.
फुटपाथ ते रंगमंच एक प्रवास–हे चरित्र त्यांनी प्रकाशीत केले आहे.
केंद्र सरकारच्या ‘भविष्य निर्वाह निधी’ मध्ये ते अंमलबजावणी आधिकारी आहेत.
राजीव जोशी.मुंबई
विविध प्रकाशनांतर्फे अनेक एकांकिका प्रकाशित.
मुलींसाठी व महिलांसाठी अनेक नाट्यछटा प्रकाशित.
दोन अंकी नाटकही लिहीले आहे.
मराठी हिंदी,इंग्लिशमध्ये अवयव दान करण्याच्या प्रचारार्थ नाटिका लिहिल्या आहेत.
परेश एजन्सी तर्फे एकाच वेळी १२२ एकांकिका प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.तो विक्रम लिम्का बुकात नोंद झाला आहे.
सुनील वसंतराव गुरव.
हे ४२ वर्षे नाट्यसृष्टीत असून यांनी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनय,दिग्दर्शन यात अनेक पारितोषिके मिळवली आहेत.तसेच यांनी अनेकदा स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले आहे.
कोलकत्ता,बंगलोर, जयपूर, जबलपूर येथेही त्यांनी राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात नाटकांचे सादरीकरण केले आहे.
समाराधना या नाट्यसंस्थेचे ते संस्थापक आहेत.त्यांच्या काही नाटकांचे अनेक प्रयोग झाले आहेत.
काही नामवंत कवींच्या काव्यवाचनाचे प्रयोगही ते नेहमी करत असतात.