बेळगाव- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचविसाव्या हरेकृष्ण रथयात्रा महामहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
रविवारी सकाळी नरसिंह यज्ञ आणि सायंकाळी वैष्णव यज्ञांचे आयोजन करण्यात आले होते .सायंकाळी नाम रामायणम गायन आणि श्लोक पाठांतर गोकुळआनंद गोकुळमच्या विद्यार्थ्यांनी सादर केले .त्यानंतर परमपूज्य चंद्रमौली स्वामी महाराजांचे प्रवचन झाले. वडगाव डान्स स्कूलच्या विद्यार्थ्यांचे भरतनाट्यम उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले.
त्यानंतर ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचे सोप्या आणि साध्या भाषेत झालेले प्रवचन भक्तांची दाद देऊन गेले.
रात्री नऊ नंतर इस्कॉनच्या भक्तानी सादर केलेली ‘गोवर्धन लीला’हे नाटक उपस्थिताना आवडले. रविवारी रात्रीही सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
*सोमवारचे कार्यक्रम*
*सुजय कुलकर्णी यांचे भरतनाट्यम*
दरवर्षी दोन दिवस होणारी रथयात्रा यावर्षी तीन दिवसाची करण्यात आली असून सोमवारी सायंकाळीही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी साडेसहा नंतर कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होतील त्यानंतर प पु चैतन्य स्वामी महाराजांचे प्रवचन आणि सुजय कुलकर्णी धारवाड यांचे भरतनाट्यम हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर चंद्रमौली महाराज आणि गोविंद स्वामी महाराज यांची प्रवचने होतील. दरम्यान सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यक्रमाचा समारोप कालिया दमण या नाट्य लिलेने होईल या सर्व कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे