Thursday, January 9, 2025

/

आयर्न मॅन मेघ शिवलकर देशात दुसऱ्या क्रमांकावर

 belgaum

जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरातील आयर्न मॅन आणि आयर्न मॅन 70.3 शर्यतीमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगावचा 21 वर्षीय ट्रायथलीट आयर्न मॅन मेघ शिवलकर याला आयर्न मॅन ऑल वर्ल्ड ॲथलेटिक (एडब्ल्यूए) कार्यक्रमा अंतर्गत 18 ते 24 वर्षे वयोगटामध्ये संपूर्ण भारतात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान जाहीर झाले आहे.

मेघ शिवलकर हा पहिला सर्वात तरुण भारतीय आहे, जो गेल्या 14 ऑगस्ट 2022 मध्ये कझाकिस्तान येथील शर्यत (18 ते 24 वर्षे वयोगट) जिंकून कैलुवा-कोना, हवाई येथील आयर्न मॅन वर्ल्ड चॅम्पियनसाठी पात्र ठरला. ही शर्यत त्याने 11:44:35 इतक्या वेळेत पूर्ण केली. तसेच कझाकिस्तान येथील शर्यत पूर्ण करण्यासाठी त्याला 11:48:55 इतका वेळ लागला होता.

वर्षभरात म्हणजे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत आयर्न मॅन आणि आयर्न मॅन 70.3 शर्यतीतील यशासाठी समर्पणासह विविध वयोगटातील ॲथलीट्स जी खडतर मेहनत घेतात, त्यासाठी आयर्न मॅन ऑल वर्ल्ड ॲथलेटिक (एडब्ल्यूए) कार्यक्रमांतर्गत स्थान दिले जाते. उल्लेखनीय बाब ही की मेघ आणि त्याची आई मयुरा शिवलकर या दोघांनीही आयर्न मॅन कझाकिस्तान शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली होती.

ॲथलीट्सना एडब्ल्यूएचे सदस्यत्व अर्ज करून मिळवता येत नाही तर ते कठोर मेहनतीच्या जोरावर प्राप्त करून घ्यावे लागते. ॲथलीट्सला मागील वर्षातील विविध शर्यतीमधील कामगिरीच्या जोरावर एडब्ल्यूए दर्जा प्राप्त होत असतो.Megh Shivalkar

हा दर्जा 12 महिने म्हणजे एक वर्षासाठी असतो आणि दरवर्षी त्याची पुनर्रचना होत असते. ॲथलीट्सच्या एडब्ल्यूए दर्जाचे नूतनीकरण किंवा कालबाह्यता संबंधित ॲथलीट्सचा मागील वर्षातील शर्यतींमधील सहभाग आणि मिळविलेले यश यावर अवलंबून असते.

फुल्ल आयर्न मॅन शर्यतीचे स्वरूप 3.8 कि.मी. पोहणे, 108 कि.मी. सायकलींग आणि 42.2 कि.मी. धावणे असे असते. हे सर्व क्रीडाप्रकार स्पर्धकाला 17 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करावयाचे असतात. हे तिन्ही क्रीडा प्रकार यशस्वीरित्या वेळेत पूर्ण करणारा स्पर्धक ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखला जातो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.