Tuesday, January 28, 2025

/

होनगा -कोगनोळी महामार्ग भूसंपादन; 400 शेतकऱ्यांना नोटीसा

 belgaum

होनगा (ता. बेळगाव) ते कोगनोळी (ता. निपाणी) महामार्गाचे सहा पदरीकरण करण्यात येत असून यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भूसंपादनाची विशेष अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी 23 गावातील बाधित 400 हून अधिक शेतकऱ्यांना दहा दिवसांच्या आत आपले म्हणणे मांडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे

केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 अनुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. होनगा ते कोगनोळी महामार्ग सध्या चौपदरी आहे. आता त्याचे सहा पदरीकरण सुरू आहे. हा महामार्ग 23 गावांमधून जाणार असून 400 शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना अधिसूचनेच्या माध्यमातून माहिती देताना म्हंटले आहे की, शेतकऱ्यांनी जमिनीशी संबंधित दस्तऐवज, जमीन विक्रीचे प्रतिज्ञापत्र, जमीन रूपांतरण ऑर्डरची साक्षांकित प्रत आणि मंजूर नकाशा आदी कागदपत्रे घेऊन स्वतः किंवा वकिलांमार्फत दहा दिवसाच्या आत 11 जानेवारी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात उपस्थित रहावे.

उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग 4 एसबीआय बँकेच्या मागे शारदा इंक्लेव्ह, दुसरा मजला, पॅटी नं. 255 सीटीएस नं. 926 शिवबसवनगर बेळगाव या कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित रहावयाचे आहे. नोटीसिद्वारे दिलेल्या 10 दिवसांच्या कालावधीत कागदपत्रे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर न केल्यास या कार्यालयात उपलब्ध कागदपत्रे आणि महसूल कागदपत्रांच्या आधारे जमिनीचा मोबदला निश्चित केला जाणार आहे.

 belgaum

केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर पिके घेतली जात असल्यास जमिनीचा पुढील कोणताही विकास किंवा पिकांची लागवड केली जाऊ नये. जमीन विकसित केल्यास अशा पीक किंवा विकासासाठी कोणतीही भरपाई दिली जाणार नाही असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, महामार्ग रुंदीकरणासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी दहा दिवसाच्या आत आपले म्हणणे मांडावे या मार्गासाठी यापूर्वी जवळपास 80% भूसंपादन झाले आहे तेव्हा गतीने काम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन बेळगावचे प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांनी केले आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.