बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील रहिवासी, हिंदू संघटना नेते रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना आज सायंकाळी हिंडलगा परिसरात घडली आहे.
हिंडलगा परिसरातून कार मधून जाताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असून रवी कोकितकर यांना केएलइएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रवी कोकितकर यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांच्या वाहनचालकालाही दुखापत झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी पलायन केले आहे.
दरम्यान घटना स्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून गोळीबार कुणी केला का केला आणि कशासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत.