Sunday, March 16, 2025

/

कुत्र्याचा असाही प्रामाणिकपणा !

 belgaum

बेळगाव लाईव्ह : माणसाचे प्राण्यावर जेवढे प्रेम आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने प्रेम आणि निष्ठा हि प्राण्यांकडून मिळते याची अनेक उदाहरणं आपण पाहतो.

गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगावमध्येही प्रामाणिक आणि इमानदारीसाठी प्रसिद्ध असलेल्या पाळीव कुत्र्याने अशीच निष्ठा जपत प्रामाणिकपणा दाखवला आहे. तालुक्यातील कल्लेहोळ भागात पोस्टाचे कर्मचारी नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने पार्टी करण्यासाठी शेतवाडीत गेले असता यावेळी त्यांचे पैशाचे पाकीट शेतवाडीतच पडले.

या शेतात पिंटू लक्ष्मण पाटील यांच्या मालकीचा पाळीव कुत्रा देखील होता. या कुत्र्याने पैशांचे पाकीट आपल्या मालकाच्या हातात आणून देत आपल्या प्रामाणिकपणाचा पुरावा दिला.Dog sincerity

आपल्यापैकी अनेकांना घरात प्राणी,पक्षी पाळण्याची आवड असते. त्यात कुत्रा हा तर कित्येकांच्या आवडीचा पाळीव प्राणी असल्याने घराघरात त्याची काळजी घेतल्याचे दिसून येते. पाळीव प्राणी आपले चांगले मित्र होतात असे मानले जाते.

पण हेच पाळीव प्राणी अनेक अडचणीत आपल्यासाठी उपयोगी ठरतात याची उदाहरणेही आपण पाहात आलो आहोत. कल्लेहोळ येथील कुत्र्याने दाखवलेला प्रामाणिकपणाही हा यापैकीच एक!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.