भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) दुसऱ्या फेरीतील (जुलै -डिसेंबर 2022) ग्राहक समाधान निर्देशांक सर्वेक्षणानुसार बेळगाव विमानतळ 0.14 गुणांसह सर्वेक्षण झालेल्या 56 विमानतळांमध्ये 16 व्या क्रमांकावर आहे. यावरून हे विमानतळ प्रवाशांना उच्च दर्जाचा अनुभव देण्याची वचनबद्धता पाळत असल्याचे स्पष्ट होते.
भारतीय विमानतळ प्राधिकरण दर 6 महिन्यांनी आपला सर्वसमावेशक अहवाल प्रसिद्ध करत असते. पार्किंग, रेस्टॉरंट आदींच्या बाबतीतील ग्राहक संतुष्टता, चेक इन कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि इतर पायाभूत सुविधा अशा एकूण 33 निकषांवर एएआय आपला अहवाल तयार करत असते.
या अहवालाद्वारे दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने आत्मपरीक्षण करून एएआय आवश्यक सुधारणा करण्याद्वारे आपल्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळावा याची खातरजमा करत असते. याबाबतीत बेळगाव विमानतळाचा सरासरी स्कोर 4.78 इतका झाला आहे.
शॉपिंग सुविधा पैशाचे मूल्य 4.9, स्नानगृह स्वच्छालय उपलब्धता 4.6, स्नानगृह स्वच्छालय यांची स्वच्छता 4.51, विमानतळ टर्मिनल स्वच्छता 4.83, जलद सामान पोहोच 4.62, विमानतळापासून वाहतूक व्यवस्था 4.8, चेक इनसाठी प्रतीक्षा कालावधी क्यू /लाईन 4.78,
सुरक्षा तपासणीतील कसूनता 4.53, शॉपिंग सुविधा 4.95. ग्राहक समाधान निर्देशांक सर्वेक्षणात बेळगावच्या आधी 14 व्या क्रमांकावर पोरबंदर, 15 व्या क्रमांकावर हुबळी व आमनगर तर बेळगावनंतर 17 व्या क्रमांकावर तिरुपती आणि त्यानंतर 18 व 19 व्या क्रमांकावर अनुक्रमे किशनघर व प्रयागराज या विमानतळांचा क्रमांक आहे.