बेळगाव लाईव्ह: म्हादई प्रकल्पाबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतर कर्नाटक सरकारची प्रकल्पासंदर्भात लगबग सुरु झाली असून म्हादई प्रकल्पला मान्यता मिळाली तरीही आपण हा प्रकल्प सत्तेवर आल्यावर तातडीने पूर्ण करू असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.
काँग्रेसची सत्ता आल्यानंतर म्हादई योजना पूर्ण करू अशी घोषणा काँग्रेस जिल्हा प्रभारी रणजितसिंह सुरजेवाला यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल, आणि काँग्रेसच सत्तेवर येईल. सत्तेवर येताच सहा महिन्यात आम्ही म्हादई योजना पूर्ण करू. यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूदही तातडीने करू शिवाय म्हादईवरील एकूण प्रकल्पांसाठी ३ हजार कोटींची तरतूद करू, असे आश्वासन सुरजेवाला यांनी दिले.
हुबळी येथे बस यात्रेची घोषणा केल्यानंतर त्यांनी म्हादईप्रश्नी सदर विधान केले आहे. यावेळी माजाची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचीही उपस्थिती होती.
म्हादई नदीचे पाणी वळवून ते पाणी मलप्रभा नदीत सोडायचे आणि हुबळी, धारवाड, नवलगुंद, नरगुंद आदी भागाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात हि योजना आहे.