Friday, December 20, 2024

/

येळ्ळूर ग्रा. पं. पीडीओ अरुण नाईक यांच्याबाबत नाराजी

 belgaum

बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीचे पीडीओ अरुण नाईक यांच्याबाबत तक्रारींचा पाऊस सुरु असून ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षांसह अनेक सदस्यांनी त्यांच्याविरोधात जिल्हापंचायत आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी तसेच ईडीला निवेदन सादर केले आहे.

येळ्ळूर ग्राम पंचायत पीडीओ अरुण नाईक यांच्याबाबत निवेदनात अनेक तक्रारी नमूद करण्यात आल्या आहेत. वेळेवर कार्यालयाला न येणे,अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना मान सन्मान न देणे, अध्यक्ष-उपाध्यक्ष व सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कामे करणे अशा तक्रारींचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

पंचायत ठराव नसतानाही पीडीओ कामे करत आहेत त्यामुळे पंचायतीच्या करामध्ये फार मोठी कमतरता होत आहे. ग्राम पंचायतीमध्ये विकास कामांऐवजी सदस्यामध्ये एकमेकांमध्ये तेढ निर्माण करणे, ग्राम पंचायत माध्यमातून जी विकास कामे झाली आहेत त्या कामांची बिले वेळेत न देणे, बिले मागणाऱ्यांना त्यांना त्रास देणे, जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मधून मंजूर झालेल्या कामांची माहिती न देणे, जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे, सरकारी आदेशांची अध्यक्ष-उपाध्यक्ष, सदस्यांना व लोकांना आगाऊ महिती योग्य रित्या न पुरविणे, रोजगार योजनेची कामे योग्य रित्या न करणे आणि रोजगार योजनेच्या विकास कामांकडे दुर्लक्ष करून रोजगार अंतर्गत झालेल्या कामांची बिले वेळेत न करणे, ई उतारा आणि एनओसी, हात उतारा वेळेवर न देणे , यासंदर्भातील कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देणे, इतकेच नाही तर सरकारी शाळा व अंगणवाडी यांच्या विकास कामांचा आराखडा 1,15,20,000/- जिल्हा पंचायत व तालुका पंचायती कडून मंजूर होऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करून अध्यक्ष व सदस्यांना याची माहिती न दिल्याने गावातील शाळा व अंगणवाड्यांचा विकास खुंटला आहे.

या सर्व कामामुळे पीडीओ अरुण नाईक यांच्याबाबत ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि गावकऱ्यांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे.Pdo yellur

या सर्व तक्रारींसह कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर न देणे, पगार देण्यासाठी टाळाटाळ करणे, यासह पूर्वसूचनेशिवाय रजा घेणे, आपल्या गैरहजेरीत दुसऱ्या पीडीओंना जबाबदारी न सोपविणे या साऱ्या बेजबाबदारपणामुळे गावातील अनेक विकासकामे रखडली आहेत. यामुळे ग्रामस्थांकडून तक्रारींचा ओघ वाढला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पीडीओ अरुण नाईक यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी करणारा ठराव पास करण्यात आला होता. मात्र आणखी एकदा त्यांना संधी देण्यात यावी या दृष्टिकोनातून पुन्हा त्यांना वेळ देण्यात आला. मात्र त्यांच्या कामकाजाच्या शैलीत कोणताही बदल न झाल्याने आता पुन्हा त्यांच्या बदलीची मागणी जोर धरू लागली असून याबाबत आज निवेदन सादर करण्यात आले आहे.

यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा पाटील, उपाध्यक्ष, लक्ष्मी मासेकर,सदस्य शिवाजी नांदूरकर, प्रमोद पाटील,परशराम परीट, रमेश मेनसे,जोतिबा चौगुले, राकेश परीट,दयानंद उघाडे, सदस्या अनुसया परीट,पार्वती राजपूत,मानिशा घाडी,रूपा पुण्यनावर, सुवर्णा बीजगरकर,शालन पाटील,वनिता परीट,सोनाली येळ्ळूरकर, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.