Saturday, April 27, 2024

/

रेकॉर्ड रूममधील कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना मनस्ताप

 belgaum

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील महसूल खात्याच्या रेकॉर्ड रूममधील कांही कामचुकार उद्धट कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

महसूल खाते आणि उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित बेळगावच्या नोंदणी कार्यालयातील कांही कर्मचारी अलीकडे जमिनीसह अन्य सरकारी कागदपत्राच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास देऊन वेठीस धरत आहेत. विशेष करून या कार्यालयातील रवी  नावाच्या या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार आणि अरेरावीच्या वर्तनामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे.

एनए ऑर्डरच्या सर्टिफाइड कॉपीसाठी अर्ज केलेल्या देसाई नामक व्यक्तीस रवी या कर्मचाऱ्यांच्या कामचुकार व उद्धट वर्तनाची प्रचिती आली आहे. एनए ऑर्डरच्या सर्टिफाइड कॉपीसाठी देसाई यांनी गेल्या 11 जानेवारी रोजी अर्ज केला होता. त्यावेळी त्यांना तेथील कर्मचाऱ्याने तुमची कॉपी मिळायला 8 दिवस लागतील असे सांगितले. त्यानुसार देसाई आठ दिवसानंतर रेकॉर्ड रूममध्ये गेले असता त्याला आज नाही उद्या या असे सांगण्यात आले.

 belgaum

दुसऱ्या दिवशी देसाई गेले असता रेकॉर्ड रूम मधील कर्मचारी रवी भिंगे याने एनए ऑर्डरची सर्टिफाइड कॉपी देण्यास टाळाटाळ सुरू केली. तेंव्हा देसाई यांनी आपली अडचण सांगण्याबरोबरच 11 तारखेला माझा अर्ज पोहोचलेला असताना तुम्ही अजूनही मला सर्टिफाईड कॉपी का देत नाही? असा जाब रवी याला विचारला. त्यावर समाधानकारक उत्तर देण्याऐवजी मला हे एकच काम नाही, चार टेबल सांभाळावे लागतात असे सांगत संतापलेल्या कर्मचाऱ्याने आकांडतांडव सुरू केले.Record office

समजूत घालण्यास गेलेल्या शिपायावर देखील भिंगे खेकसला. तसेच देसाईंना आत्ता ती सर्टिफाइड कॉपी देऊ नको त्याना नंतर 5 वाजता यायला सांग, असेही त्यांनी त्या शिपायाला बजावल्याचे देसाई यांनी बेळगाव लाईव्हला सांगितले.

तसेच रेकॉर्ड रूममधील कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या या वागणुकीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रेकॉर्ड रूममधील कांही कर्मचारी कामचुकारपणा करून नागरिकांना विनाकारण त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.