बेळगाव लाईव्ह : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी हुबळी दौरा पार पडला. रोड शो, राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन या पार्श्वभूमीवर हुबळीमध्ये दाखल झालेल्या पंतप्रधानाच्या दौऱ्यात आज ६० फूट उंचीच्या मोदी कोटची चर्चा जोरदार होती.
६० फूट उंच असलेल्या या कोटची निर्मिती बेळगावच्या खडेबाजार येथील सुप्रसिद्ध ‘एस. के. काकडे’ टेलर्स यांच्यावतीने करण्यात आली आहे.
‘जॉन अँड ब्राउन’ने यासाठी लागणारे कापड उपलब्ध करून दिले आहे. पंतप्रधानांच्या हुबळी दौऱ्यातील हा कोट विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
पंतप्रधानांच्या कार्याने प्रेरित सुप्रसिद्ध टेलर सचिन काकडे यांनी या कोटची निर्मिती केली असून पंतप्रधानांच्या भेटीसाठी सदर कोट तयार करण्यात आला आहे.
६० फूट उंचीचा मोठा आणि २ इंच आकाराचा लहान कोट बनवून एक आगळीवेगळी भेट या चाहत्याने पंतप्रधानांना दिली आहे. या कोटसाठी सचिन काकडे टेलर्स यांनी परिश्रम घेतले असून दूरवरून देखील हा कोट अनेकांचे लक्ष वेधत होता.