बेळगाव लाईव्ह : भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी’ पुरस्काराने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बेंगळुरू येथील सर पुट्टण्णा चेट्टी टाऊन हॉल येथे निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या तेराव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना आणि बीबीएमपीचे मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ उपस्थित होते.
सदर पुरस्कार भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, कर्नाटक द्वारे प्रदान करण्यात आला.
यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी विभागाचा मतदार नोंदणी, पुनरिक्षण यासह एकूणच निवडणूक कामातील सर्वोत्तम कामगिरी लक्षात घेऊन विविध श्रेणींमध्ये देण्यात येणारा पुरस्कार कागवाडचे तहसीलदार राजेश बुरली यांना प्रदान करण्यात आला.