कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आचारसंहिता सुरू झाली की भेटवस्तू देण्यावर निर्बंध येतात, त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींनी आताच वेगवेगळ्या भेटवस्तू देण्याची नवी शक्कल सुरू केली आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघांमध्ये लोकप्रतिनिधींनी रांगोळी स्पर्धा घेऊन कुपन वाटप आणि त्यानंतर नारळावर हात ठेवून शपथ घेऊन कुकर आणि मिक्सरचे वाटप असा नवा फंडा सुरू केला आहे.
या फंड्याला महाराष्ट्र एकीकरण समिती नीष्ट सीमा भागावरील बाचि गावातील नागरीकांनी एक चांगलाच संदेश दिला असून कुकरला कुकरच्या रांगोळीचे प्रतिउत्तर असे चित्र दिसून येऊ लागले आहे.
बाची येथील युवा कार्यकर्ते सचिन बाळेकुंद्री, एल आर मासेकर,गुंडू गुंजिकर ,किरण गुंजिकर,सागर गुंजिकर सागर जाधव महादेव हुंद्रे मंथन गुंजिकर श्रीशैल मासेकर आणि युवकांनी एक आगळीवेगळी रांगोळी काढून या मोहिमेचा विरोध केला आहे.
कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र राज्यात जाण्याचा आपला निर्धार पक्का आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीशी प्रामाणिक राहणार, राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी कितीही भेटवस्तू वाटल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही. असा संदेशच या रांगोळीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
कुकर मिक्सर आणि साड्या वाटून निवडून आल्यानंतर पाच वर्षे मराठी संपवण्याचेच काम आपण करत आहात. त्यामुळे आता तुमचे कुकर नको, मिक्सर नको आणि साड्याही नको.आम्ही मराठी अस्मितेसाठी प्रामाणिक राहणार. असा संदेशच या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आल्यामुळे संपूर्ण सीमा भागात याची चर्चा होताना दिसत आहे. बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत कोणत्याही मतदारसंघात नागरिकांनी राष्ट्रीय पक्षांच्या भेट वस्तूंना आणि आमिषांना बळी पडू नये. असा संदेशच बाची गावातील या सीमा रेषेवरील युवकांनी दिला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना पैशाच्या जीवावर मते विकत घेता येतात. असे समजण्याची वेळ आता गेली. अशा शब्दात हे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे लोकप्रतिनिधींची ही आता पाचावर धारण बसणार आहे.यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर युवा नेते आर एम चौगुले रांगोळी स्थळी भेट दिली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत आणि मराठी आस्मीता जपण्याचे आवाहन केले.