belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्यातील काँग्रेस नेत्यांना आम आदमी पक्षाची धास्ती लागली असून काँग्रेसकडून आपच्या योजना चोरून राबविल्या जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते राजकुमार टोपण्णावर यांनी केला.

bg

देशातील भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी आम आदमी पक्षाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. लोकहितार्थ योजना राबवून आम आदमी पक्षाने आजवर प्रगती साधली असून डीकेशी आणि सिद्धरामय्या यांच्याकडून केल्या जाणाऱ्या विधानाची त्यांनी खिल्ली उडविली.

आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये गरीब कुटुंबासाठी ३०० युनिट मोफत वीज देण्यासंदर्भात प्रचार केला आणि हीच योजना कर्नाटकात काँग्रेस राबवत आहे, असा आरोपही टोपण्णावर यांनी केला.

कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांकडे स्वतंत्र योजना, कल्पना नाहीत. गरीब जनतेच्या उद्धारासाठी कर्नाटकातील काँग्रेस पक्ष आपच्या योजनांची कॉपी करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र राज्यातील जनता काँग्रेसची हि मानसिकता स्वीकारणार नाही असे मत त्यांनी मांडले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.