Daily Archives: Jan 31, 2023
मनोरंजन
राहुल गीते ‘फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड्स’ ने सन्मानित
बेळगाव लाईव्ह : फिटनेस आणि वेलनेस उद्योगातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रामाणिक व्यक्तींच्या सन्मानार्थ 'कोएलिशन ऑफ एक्सरसाइज प्रोफेशनल्स ऑफ इंडिया'द्वारे आयोजित फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड्स 2023 या पुरस्काराने बेळगावमधील राहुल गीते यांना सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या...
बातम्या
‘त्या’ गांजा प्रकरणाची एडीजीपी अलोक कुमार यांनी घेतली दखल
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये एका गांजा प्रकरणी पोलिसांनी पैसे घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सदर माहिती उघडकीस आली होती. या प्रकरणाची दखल कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी गंभीर रित्या घेतली असून याप्रकरणाची...
राजकारण
कायदेशीर लढाईनंतरच ‘म्हादई’बाबत आदेश : मुख्यमंत्री बोम्मई
बेळगाव लाईव्ह : म्हादई नदीचे पाणी वळविण्यासंदर्भात कर्नाटकाला दिलेली मान्यता रद्द करण्यासाठी गोवा सरकार पंतप्रधानांना विनंती करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतीच जाहीर केली.
याबाबत प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, कायदेशीर लढाईनंतर केंद्राने अंतरिम आदेश...
बातम्या
नगरसेवकाचा प्रताप! शपथविधीआधीच फोडला कमिशनचा नारळ!
बेळगाव लाईव्ह : महानगर पालिका निवडणुकीनंतर महापौर-उपमहापौर निवडणुकीची आवासून वाट पाहणाऱ्या नगरसेवकांना तब्बल १७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आनंदाची बातमी मिळाली आहे.
मात्र, बेळगाव महानगरपालिकेतील वादग्रस्त प्रभागामधील एका नगरसेवकाने या आनंदाच्या भरात शपथविधी होण्यापूर्वीच कंत्राटदाराकडून कमिशन खाल्ल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
बेळगावमध्ये...
राजकारण
शिवसैनिकांनीच ठरवलं शिवसेना वाढवायचं
बेळगाव शहरातील टिळक चौकामध्ये आज मंगळवारी शिवसेनेच्या निष्ठावंत स्वाभिमानी शिवसेनिकांतर्फे 'शिवबंधन' बांधण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 100 हून अधिक नवयुवक शिवबंधन बांधून घेण्याद्वारे शिवतेजात बद्ध झाले.
टिळक चौक येथे शिवसेना अधिक बळकट आणि सक्रिय करण्यासाठी आज मंगळवारी...
बातम्या
डीसीपी गडादी यांच्यासह 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या
कर्नाटक सरकारच्या गृहमंत्रालयाने बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) रवींद्र गडादी व सहाय्यक पोलीस उपायुक्त (एसीपी) नारायण बरमनी यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचाली गतिमान झाल्या...
बातम्या
बेळगावमधील ‘त्या’ घटना वैयक्तिक…
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये गेल्या काही दिवसात अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत. या घटना वैयक्तिक वादातून झाल्या असून याचा संघटनेशी किंवा राष्ट्रीय पक्षांशी कोणताही संबंध नाही. मात्र काहीजणांकडून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी याला धार्मिक रंग देण्यात येत असल्याचा आरोप...
बातम्या
यादी रद्द झाल्याने पुन्हा रखडली शिक्षक भरती
शिक्षण भरतीसाठी सार्वजनिक शिक्षण खात्याने जाहीर केलेली तात्कालीक यादी रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बजावल्यामुळे शिक्षक भरती पुन्हा रखडली आहे. परिणामी शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून 15,000 शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे....
बातम्या
दलित महिलेची प्रशासनाकडे मदतीची हाक
राहत्या घराची खरेदी केली असताना पोलिसांना हाताशी धरून मूळ घर मालकाच्या मुलाकडून जातीवाचक अर्वाच्य शिवीगाळ आणि मारहाण करण्याबरोबरच विविध प्रकारे त्रास देऊन आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या पाठीशी कोणीच नसल्यामुळे प्रशासनाने मदत करून आम्हाला न्याय मिळवून...
बातम्या
‘त्या’ अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार : रमाकांत कोंडुसकर
बेळगाव लाईव्ह : लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी करत आहेत. राऊडी शीट आणि तडीपार करण्याचा इशारा देऊन कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला असून समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...