बेळगाव लाईव्ह : डब्बे, कुक्कर वाटप करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे नागरिकांच्या मूलभूत सुविधेकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत गुरुवारी 'बेळगाव लाईव्ह'ने वृत्त प्रकाशित केले. बेळगुंदी आणि परिसरात योग्य बससुविधा उपलब्ध नसल्याने संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाविरोधात निषेध पत्रक काढले. हे निषेध पत्रक देखील सोशल मीडियावर...
बेळगावात यंदा थंडी 'लेट कमर'!
वातावरणातील विचित्र बदल प्रत्येक घटकासाठी ठरतोय घातक
ऊन-वारा-पावसाच्या विचित्र खेळाचा बसतोय फटका
बेळगाव लाईव्ह विशेष: जागतिक तापमानात होणाऱ्या बदलाचा परिणाम अलीकडे मोठ्या प्रमाणात जाणवू लागला असून ऋतूबाह्य ऋतूचा हंगाम अनुभवण्यास मिळत आहे. उन्हाळ्यात पाऊस तर कधी पावसाळ्यात...
बेळगाव लाईव्ह : अपघात टाळण्यासाठी आणि वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी रस्त्यावर गतीरोधक निर्माण केले जातात. मात्र अलीकडे अनेक अपघात हे अतिरोधकांमुळेच होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
गतीरोधक निर्मितीच्या काही शास्त्रोक्त पद्धती आहेत. नियम आहेत. मार्गदर्शक तत्वे आहेत. परंतु बेळगावमध्ये अनेक रस्त्यावर...
बेळगाव लाईव्ह विशेष : निसर्गसौंदर्याने आणि वनश्रीने बहरलेले बेळगाव समृद्ध आहे. बेळगाव आणि बेळगावकरांसाठी वनराईचा अभ्यास हा संशोधनाचा विषय आहे. वनश्रीने नटलेल्या आणि समृद्ध असलेल्या बेळगावमध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. जुनाट वृक्ष, फळ आणि फुल झाडांनी बहरलेल्या परिसरातील वनराईचे...
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने दरवर्षी आयोजिण्यात येणारा 'अन्नोत्सव' यंदा ६ जानेवारीपासून सुरु होत आहे. बेळगाव आणि परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दरवर्षी रोटरीतर्फे हि पर्वणी मिळते. गेल्या २ वर्षात कोविडमुळे रखडलेला अन्नोत्सव यंदा ६ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत अन्नोत्सव...
सौंदत्ती श्री यल्लमा देवी यात्रा आटोपून येळ्ळूरला परतणाऱ्या भाविकांचा पडल्या भरणे कार्यक्रम सुरळीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने यल्लाप्पा पाटील व त्यांचे मित्र प्रशांत नंदीहळ्ळी यांनी गावच्या थडे देवस्थान जवळील जमिनीचे स्वखर्चाने सपाटीकरण व स्वच्छता केली आहे.
सालाबाद प्रमाणे येळ्ळूर गावचे...
अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाब विचारणारे भाजप नेते अनंत पाटील यांच्यावर बस आगार व्यवस्थापक आणि बस चालक -वाहकांनी हल्ला चढवून मारहाण केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी खानापूर बस स्थानकाच्या ठिकाणी घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की खानापूर येथील...
प्रवास करणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसला भर रस्त्यात शॉर्टसर्किटने अचानक आग लागण्याची घटना हत्तरगी (ता. हुक्केरी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर घडली. मात्र सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
हत्तरगी गावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या...
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आईची शपथ घेत 29 डिसेंबर रोजी पंचमसाली लिंगायत समाजाला आरक्षणाची घोषणा केली. तथापि त्यांनी आम्हाला अपेक्षित आरक्षण दिले नाही. पंचमसाली समाजाला दिलेले 2 -डी आरक्षण आम्ही नाकारत असून 2 -ए आरक्षणासाठी आमचा लढा सुरूच राहील,...
बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येत्या २४ तासात पंचमसाली लिंगायत समाजाला २ए श्रेणीत आरक्षण देण्यासंदर्भात पुढील कारवाई करावी, अशी मागणी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली.
बेळगावमध्ये गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंचमसाली समाजाला २डी...