बेळगाव ही राज्याची दुसरी राजधानी असली तरी ती विकास आणि संधींपासून कायम वंचित आहे, असा मुद्दा बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित केला.
विधानसभेत बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी विविध जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असले तरी त्यांना विद्यार्थी वसतीगृहात प्रवेश मिळत नाही असे सांगून वसतीगृह प्रवेशाची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी समाज कल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांच्याकडे केली.
त्यावर उत्तर देताना मंत्री पुजारी यांनी वस्तीगृहासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र 200 विद्यार्थ्यांची आधीच प्राधान्याने राहण्याची सोय करण्यात आली आहे.
तेव्हा पुढील आर्थिक वर्षात आणखी अनुदान देऊन उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले या पद्धतीने आमदार अनिल बेनके यांनी विद्यार्थी वस्तीगृह प्रवेशाची समस्या सदनात मांडली आहे त्यावर सरकार दिलेले आश्वासन पाळणार का? हे बघावे लागेल.