बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावमध्ये संपूर्ण राज्यातील मंत्रीमहोदयांचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील विविध ठिकाणी विकासकामांना गती देण्यात आली आहे.
मात्र नेहमीच विकासाच्या नावाने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करणाऱ्या प्रशासनाने कोर्ट परिसरात सुरू केलेल्या विकासाकामांतर्गत खोदाई करण्यात आली आहे. दरम्यान या विकासकामामुळे प्रशासकीय कामाचा आंधळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जुन्या जिल्हा पंचायतीसमोरील परिसरात झालेल्या खोदकामामुळे पाईपलाईन फुटून पाणी गळती सुरू झाली आहे.
फुटलेल्या पाईपलाईनमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून या प्रकाराकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे. यासंदर्भात तातडीने लक्ष पुरवून पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.