वंदे भारत एक्सप्रेस ही मध्यम अति वेगवान आधुनिक एक्सप्रेस रेल्वे लवकरच बेंगलोर ते हुबळी आणि बेळगाव दरम्यान धावेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.
बेळगावच्या नूतन मध्यवर्ती बस स्थानकाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सर्व कांही योजनेनुसार सुरळीत झाल्यास ही प्रतिष्ठेची व आधुनिक रेल्वे सुरू करण्यात येणार असून जेणेकरून तिला या प्रदेशातील पहिली आंतरराज्य वंदे भारत रेल्वे सेवा बनवले जाईल, असेही मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुदा येत्या 30 डिसेंबर रोजी हावरा ते न्यू जलपाईगुरी दरम्यान धावणाऱ्या देशातील 7 व्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत.
सध्या देशात सुरू असलेल्या वंदे भारत रेल्वे सेवा पुढीलप्रमाणे आहेत. वाराणसी -नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कत्रा -नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल -गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस, नवी दिल्ली -एम्ब अंडुरा वंदे भारत एक्सप्रेस,
चेन्नई -म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेस आणि बैलसपुर -नाग वंदे भारत एक्सप्रेस. आता बेंगलोर ते बेळगाव अशी आधुनिक वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत आहे.