Friday, January 10, 2025

/

18 ठिकाणी भूमिगत कंटेनर योजना राबविण्यास प्रारंभ

 belgaum

बेळगाव शहरात पहिल्या टप्प्यामध्ये विविध 18 ठिकाणी भूमिगत कंटेनर योजना राबविण्यास प्रारंभ झाला असून संबंधित सर्व ठिकाणाहून कचऱ्याची उचल सुरू झाली आहे.

प्रारंभी वाहनाच्या सहाय्याने कंटेनर उचलण्यास व त्यातील कचरा वाहनात टाकण्याच्या प्रक्रिया विलंब लागला असला तरी आता ती प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असल्याचे मनपा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सध्या बेळगाव दक्षिण विभागातील भूमिगत कंटेनर्स मधील कचऱ्याची उचल करण्यासाठी एक वाहन उपलब्ध आहे. उत्तर विभागातही कंटेनर्स बसविण्यात येणार असून त्यासाठी जागा निश्चिती आणि नवीन वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शहरामध्ये 58 प्रभाग असून वर्षभरात या सर्व प्रभागात कंटेनर्स बसविले जाणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचा प्रकार बंद होऊन ‘ब्लॅक स्पॉट’ कमी होतील असे महापालिकेचे मत आहे. शहरात जक्कीर होंडा, बीएससी टेक्सटाईल मॉल, आनंदवाडी कुस्ती आखाडा, आरपीडी सर्कल, लिंगायत स्मशानभूमी, केएलएस स्कूल, धनश्री गार्डन, गोवावेस सर्कल, जुना धारवाड रोड गणपती मंदिराजवळ, शंभर फुटी डबल रोड, सफाई कामगार वसाहत, केएसआयडीसी कार्यालयाजवळ, संत रोहिदास नगर, शांतीनगर कॉलनी, रहाणे नगर, चौथे रेल्वे गेट व आंबेडकर नगर या ठिकाणी भूमिगत कंटेनर बसविण्यात आले आहेत.

बेळगावात छ. शिवाजी उद्यानानजीक 2021 मध्ये पहिला भूमिगत कंटेनर बसविण्यात आला आणि त्याचे प्रात्यक्षिक त्यावर्षी डिसेंबर मध्ये घेण्यात आले. तथापि त्यावेळी वाहनात बिघाड निर्माण झाल्याने या योजनेची अंमलबजावणी कांही काळ लांबणीवर पडली होती.

त्यानंतर वर्षभराच्या काळात पुन्हा भूमिगत कंटेनरसाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला. आणखी कांही कंटेनर्सची खरेदी करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्याआधी म्हणजे या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गोवावेस येथे या योजनेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सुरुवातीला वाहनाच्या सहाय्याने कंटेनर उचलण्यास व त्यातील कचरा वाहनात टाकण्याच्या प्रक्रियेला विलंब लागला. मात्र आता ती प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.