कर्रानाटक राज्यातील शाळांमध्ये माध्यान्ह आहार वितरणावेळी होणारी विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी या आहाराच्या वितरणाचे नवे वेळापत्रक शिक्षण खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार गर्दी टाळण्यासाठी दोन टप्प्यात विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचे वितरण करण्यास सांगण्यात आले आहे.
या नव्या निर्णयासंदर्भात शिक्षण खात्याने परिपत्रक जारी केली आहे. नव्या वेळापत्रकानुसार इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारी 1 ते 1:45 या वेळेत माध्य्यान आहार वितरित करण्यात येईल. त्याचप्रमाणे इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारी 2 ते 2:40 या वेळेत माध्यम आहार वितरण करण्यास सांगण्यात आले आहे.
या आदेशाची प्रत संबंधित जिल्हा व गटशिक्षणाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्याकडून सर्व शाळांना याबाबत सूचना दिली जाणार आहे. या खेरीज माध्यान्ह आहार व दूध वाटप करताना दर्जा व स्वच्छतेबाबत खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
माध्यान्ह आहारासाठी प्रत्येक शाळेत आहार देताना विद्यार्थ्यांकडे स्टील प्लेट असाव्यात, अन्य कशाचाही वापर केला जाऊ नये. प्लेट्सची संख्या कमी असेल तर देणगीदारांकडून देणगी जमा केली जावी. देणगीतून प्लेट्स खरेदी कराव्यात. प्लेट व दुधासाठी ग्लास घरून आणण्याचा प्रकार थांबवावा.
असा प्रकार आढळून आल्यास संबंधित शाळेवर कारवाई केली जाईल असेही शिक्षण खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याखेरीस आहार व दूध वाटपाबाबत सूचना करण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे आहेत. आहार तयार करताना व वाटपाप्रसंगी डोक्यावर टोपी तसेच वापर आवश्यक आहे.
माध्यम आहारासाठी धान्याचा वापर करावा. आहार विद्यार्थ्यांना देण्याआधी त्याचा दर्जा तपासला जावा. लोह, फॉलिक ॲसिड तसेच जंताच्या गोळ्यांची एक्सपायरी तारीख दर आठवड्याला तपासणी जावी. आहार बंद कंटेनरमध्ये व योग्य तापमानात आहे की नाही हे तपासले जावे. आहाराचा दर्जा तपासण्यासाठी प्रत्येक शाळेत समिती स्थापन करण्यात यावी.