आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिणमधून इच्छुक असलेले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एस एम बेळवटकर यांनी आज बुधवारी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावला आलेले विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आज बुधवारी उचगावला भेट दिली. उचगाव येथे माजी बुडा अध्यक्ष युवराज कदम यांच्या निवासस्थानी बेळगाव दक्षिणमधून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले बेळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सातेरी महादेव बेळवटकर यांनी त्यांची निवडणुकी संदर्भात भेट घेतली.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी बेळगाव ग्रामीणच्या आमदार हेब्बाळकर विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे धडाडीचे युवा नेते म्हणून सुपरिचित असलेले सातेरी बेळवटकर हे बेळगाव दक्षिण मतदार संघातून आगामी विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी उमेदवारीसाठी अर्जही दाखल केला आहे.
आमदार हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य हट्टीहोळी यांचा उमेदवारीसाठी बेळवटकर यांना समर्थन आहे काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असण्याबरोबरच अनेक कार्यात आघाडीवर असतात अश्या सातेरी बेळवटकर आगामी निवडणुकीचे काँग्रेसचे तिकीट मिळावे असा आग्रह त्यांनी केलाय.