बेळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे विशेषता निपाणी जवळील कोगनोळी टोलनाका आणि हिरे बागेवाडी जवळील हिरेबागडी टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या दोन्ही टोल नाका परिसरात मंगळवारी अलर्ट देण्यात आला असून हजारो पोलीस तैनात करण्यात केले आहेत.
निपाणी जवळील कोगनोळी टोलनाक्यावर, महाराष्ट्राच्या मंत्री बेळगावचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांना बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी केल्यानंतर कोगनोळी जवळ कोणतेही आंदोलन होऊ नये कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी घेत पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
तर दुसरीकडे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील बेळगाव जवळील हिरे बागेवाडी जवळील टोलनाक्यावर देखील शेकडोच्या संख्येने पोलीस तैनात आहेत.मंगळवारी सकाळी पासूनच हिरेबागेवाडी टोल नाका परिसरात मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला आहे
कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा आपल्या शेकडो समर्थकासह बेळगाव मध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत शहर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये शांतता बिघडू नये याची दक्षता घेण्यासाठी पोलिसांनी नारायण गौदाला टोलनाक्यावर ताब्यात घेऊन पुन्हा बंगळुरु कडे पाठवण्याचा ठरवले आहे. त्यासाठी टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळपासूनच टोलनाक्यावर शेकडो पोलीस दलात करण्यात आलेले आहेत नारायण गौडा बेंगलोर मधून आपल्या शेकडो समर्थकांसह बेळगावच्या दिशेने निघालेले असून ते बेळगाव मध्ये पोहोचायच्या अगोदर त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना प्रवेश बंदी करावी यासाठी नारायण गौडा बेळगाव शहरात आंदोलन करणार होते मात्र महाराष्ट्राच्या मंत्र्यांना जिल्हा बंदी केल्यानंतर पोलिसांनी करवे कार्यकर्त्यांना देखील बेळगाव बाहेर ताब्यात घेऊन त्यांना परत पाठवण्याचे तयारी सुरू केलेली आहे. एकूणच हायवे वरील दोन्ही बेळगाव जिल्ह्यातल्या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बेळगाव प्रवेशासंदर्भात सर्व २२ सीमांवरील चेकपोस्टवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . एसीपी संजीवकुमार यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून , बेळगावात येणाऱ्या वाहनांची तपासणी करूनच वाहने पुढे सोडली जात आहेत .