सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने यांचा उद्या मंगळवार 6डिसेंबर रोजी होणारा दौरा रद्द झाला असला तरी बेळगाव जिल्हा प्रशासनाने या तिन्ही नेत्यांच्या प्रवेश बंदीचा आदेश काढला आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चंद्रकांत दादा पाटील शंभूराज देसाई यांनी धैर्यशील माने यांना सहा डिसेंबर रोजी बेळगाव जिल्हा प्रवेश बंदीचा आदेश जारी केला आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा निमित्त पुढे करून कलम 144 नुसार या महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी असल्याचा जिल्हाधिकारी प्रसिद्धी पत्रकात प्रसिद्ध केले आहे.
संस्थेच्या निमित्त पुढे करून महाराष्ट्रातील नेत्यांकडून भडकाऊ भाषण देण्याची शक्यता आहे त्यामुळे वातावरण बिघडून आता भंग होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने प्रवेश बंदीचा आदेश बजावला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटल आहे.
Crpc 1973कलम 114(3) अंतर्गत नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदीचा आदेश बजावला आहे.
तत्पूर्वी सोमवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दौरा रद्द करणार असल्याचे सूचित केला होते त्यानंतर आज सायंकाळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना प्रवेश बंदीचा आदेश जाहीर केला आहे.
मध्यवर्ती घेणार जिल्हाधिकारी यांची भेट
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमा प्रदेशातील मराठी भाषिकांचे प्रश्न ऐकून त्यावर उपाय योजना करण्यासाठी महाराष्ट्राचे सीमा प्रश्न समन्वयक मंत्री सीमा भागातील मराठी भाषिकांना भेटण्यासाठी बेळगावला येणार आहेत. परंतु कर्नाटक सरकारने त्यांना रोखाण्याचे प्रयत्न चालू केले आहेत, यामुळे घटनात्मक अधिकाराची पायमल्ली होणार आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लिहीलेल्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिल्लीला पाठविण्या संदर्भात म.ए.समितीचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची भेट घेणार आहेत तरी पदाधिकारी, नागरिक
कार्यकर्ते यांनी मंगळवार दिनांक 6डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3:30 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालया जवळ जमावे असे आवाहन मध्यवर्ती म ए समितीच्या वतीने करण्यात आले आहे.