बेळगाव सुवर्णसौध मधील हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या समस्यांबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. त्याचप्रमाणे उत्तर कर्नाटकातील आमदारांना बोलूही दिला नाही, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाच्या आवारात आज गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. सुवर्णसौधमधील हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकच्या समस्यांबाबत कोणतीच चर्चा झाली नाही.
उत्तर कर्नाटकातील आमदारांना बोलू देखील दिले नाही. काल त्यांनी केवळ एक दिवस चर्चेला परवानगी दिली. खरे तर पहिल्या दिवशीच चर्चेला परवानगी द्यायला हवी होती.
आम्हाला संधी दिली असती तर आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असती. शेवटच्या दिवशी संधी दिल्यास काहींही चर्चा होऊ शकत नाही. या सुवर्णसौधमध्ये उत्तर कर्नाटकाच्या समस्या बाबत चर्चाच झाली नाही, असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.