महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी महाराष्ट्राच्या गृह खात्याने अप्पर पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागात दिवसेंदिवस असताना वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
दोन्ही राज्यातील निर्माण होत असल्यामुळे सीमा भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या गृह खात्याने काल बुधवारी घेतला.
या समितीचे अध्यक्षपदी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक के. के. सारंगल असणारा आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली या समितीचे सदस्य असणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विशेष समितीच्या स्थापनेबद्दल नियोजन झाले होते.