महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रदेशातील मराठी माणसाच्या पाठीमागे गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ शरद पवार साहेब खंबीरपणे उभे आहेत.अगदी अलीकडेच दोन्ही राज्यात निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती पवार साहेबांच्या एका वाक्याने निवळली इतकं सामर्थ्य त्यांच्या वाणीत आहे. असे उदगार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी काढले.
बेळगावचा सीमा प्रश्न आत्ता त्यांनी केंद्र सरकारपुढे मांडून सीमाभागाला न्याय द्यावा अशी त्यांना विनंती आहे.वाढदिवसानिमित्त सीमाभागातील समस्त जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देताना उपस्थितांनी पवार साहेबच सीमाप्रश्नाची सोडवणूक करतील असा आशावाद व्यक्त केला.
सीमाभागाचे आधारस्तंभ,भारताचे माजी कृषी आणि सरंक्षण मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवस कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.महाराष्ट्र एकीकरण समिती आणि ट्रक बॉडीबिल्डर यांच्या वतीने हरिकाका कंपाऊंड येथे वाढदिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर युवा नेते आर एम चौगुले,रमेश मोदगेकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार,नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवाजी शिंदे, मनोहर संताजी, माजी नगरसेवक बसवंत हलगेकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र मोदगेकर होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन रमेश मोदगेकर यांनी केले.व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणे केली.त्यानंतर सामूहिकपणे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी हरिकाका कंपाऊंड ट्रक बॉडीबिल्डर, ट्रक चालक मालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन बामणे यांनी तर आभार किरण मोदगेकर यांनी मानले.