समाजातील सर्वसामान्यांसह उपेक्षित गोरगरिबांसाठी असणाऱ्या राज्यभरातील 114 नम्म क्लिनिक्सचे उद्घाटन झाल्यानंतर आज बुधवारी बेळगावातील शाहूनगर येथील ‘नम्म क्लिनिक’ या दवाखान्याचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.
शाहूनगर येथील नम्म क्लीनिकच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी, बेळगाव ग्रामीणचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. चेतन कंकणवाडी, प्रभाग क्र. 34 चे नगरसेवक श्रेयस नाकाडी, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, मुत्त्यानट्टीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता कीनगी, नगरसेविका रेश्मा प्रवीण पाटील, भाजप उत्तर मंडल अध्यक्ष विजय कोडगणनूर, जी. ए. लिंगन्नावर, बालचंद्र सावनुर, ए. सी. अंगडी आदी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मंत्री के. सुधाकर यांच्या हस्ते राज्यभरातील शहरी भागात असणाऱ्या 114 नमक क्लिनिक्सचे आभासी उद्घाटन नुकतेच पार पडले.
ही देशातील अशी पहिली योजना आहे की जिच्याद्वारे शहरातील गरिबांसाठी सुगम आरोग्य सेवेची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या जानेवारीपर्यंत राज्यभरात असे 438 नम्म क्लीनिक सुरू करण्याची योजना आहे.