बेळगावच्या जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी घातली आहे. हातकणंगलेचे खासदार सीमा प्रश्न नियुक्त केलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना देखील बेळगाव प्रवेश बंदीचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावल्यानंतर खासदार माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी बेळगावला जाणार की नाही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलल्यानंतर ठरवणार आहे असं धैर्यशील माने यांनी म्हटल आहे.कोल्हापूर मध्ये बेळगाव प्रवेश बंदी नंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
मी रितसर कर्नाटक शासनाला पत्र लिहिलं होतं ते पत्र मराठी मध्ये पाठविले होत, त्यामुळे त्यांनी त्याला उत्तर दिलं नाही.त्यानंतर हिंदी मध्ये पत्र पाठविले, पण त्याला देखील उत्तर दिलं नाहीनंतर मी इंग्रजी मध्ये पत्र पाठविले त्याला कर्नाटक सरकारने कन्नड मध्ये मला पत्र पाठवून उत्तर दिले. यावरुन सीमा भागातील मराठी बांधवांना किती त्रास होतो हे दिसून आलं असेही खासदार माने यांनी पुढे म्हटल आहे.
मी तज्ञ समितीचा अध्यक्ष असताना मला बंदी घातली जाते हे बरोबर नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलल्या नंतर ठरवणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
मी बेळगावला जाणार की नाही, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याशी बोलल्यानंतर ठरविणार..