बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या एम. जी. हिरेमठ यांची आता बेळगाव प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी अधिकारपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
सरकारच्या अधिसूचनेनुसार हिरेमठ यांनी आज सोमवारी बेळगाव प्रादेशिक आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत.
एम. जी. हिरेमठ यांनी यापूर्वी बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षे समर्थपणे कार्य केले आहे. बेळगाव जिल्हाधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर बेंगळूर ऊर्जा विभागात व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते काम पाहत होते.
त्यानंतर आता पुन्हा त्यांची बेळगाव प्रादेशिक आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान हिरेमठ यांनी प्रादेशिक आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.