Tuesday, January 7, 2025

/

सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनाना निधी द्या

 belgaum

सीमाभागात गेल्या ३८ वर्षांपासून मोठ्या पातळीवर साहित्य संमेलने आयोजित करण्यात येत आहेत. सध्या १२ हून अधिक संमेलने बेळगाव मध्ये आयोजित करण्यात येत आहेत. या सर्व संमेलनामधून मराठी साहित्य संस्कृतीचा जागर करण्यात येतो.

ही संमेलने लोकवर्गणीतून यशस्वीरित्या पार पाडली जात आहेत. मात्र, या संमेलनांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी संमेलन संयोजकांनी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली.

यासंदर्भात महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या ३ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या बेळगाव दौऱ्यादरम्यान निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्याचा निर्णय संमेलन संयोजकांच्या बैठकीत घेण्यात आला.Chandrakant dada patil

सीमाभागात गेल्या ३८ वर्षांपासून लोकवर्गणीतून सुरू असलेल्या साहित्य संमेलनांना आर्थिक सहकार्य मिळावे, यासंदर्भात रामलिंग खिंड गल्ली येथील जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस साहित्य गुणवंत पाटील मधु पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

१९८६ पासून सीमाभागात मराठीचा जागर करण्यासाठी मराठी साहित्य संमेलने भरविली जातात. याआधी काही वेळा सीमाभागातील साहित्य संमेलनांना आर्थिक निधी मिळाला होता. मात्र, अलीकडे या संमेलनांना आर्थिक निधीची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ही अडचण दूर करावी, या मागणीचे निवेदन सीमा समन्वयक मंत्र्यांना देण्यात येणार आहे.

दरवर्षी भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनामध्ये १२० हुन अधिक साहित्यिक सहभागी होतात. याचप्रमाणे साहित्य संमेलनाच्या एकंदर आयोजनाचा खर्च दोन ते अडीच लाख रुपयांच्या आसपास होत आहे. सीमा भागातील मराठी साहित्य संमेलनांना आर्थिक सहकार्याची गरज असून या संदर्भात संमेलन संयोजकांकडून सीमा समन्वयकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

या बैठकीला बाबुराव गौंडाडकर, शिवाजी कुट्रे, शिवाजी शिंदे, श्रीकांत कडोलकर, भरत गावडे आदी उपस्थित होते.

हुतात्म्यांच्या वारसांच्या घरी देणार भेट

हुतात्म्यांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाकडून मिळत असलेली थकलेल्या मासिक पेन्शनची सुरू करण्यात आलेला सरकारी आदेश सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील सोबत बेळगाव भेटीत घेऊन येणार असून ते स्वतः त्यांच्या घरी भेट देऊन पेन्शन सुधारित जी आर हुतात्म्यांच्या वारसांना सुपूर्त करणार आहेत.बेळगाव भेटीत मंत्री पाटील कंग्राळी खुर्द येथील हुतात्मा कै.मारुती बेन्नालकर, शहापूर येथील मधू बांदेकर आणि जुने बेळगाव येथे विद्या शिंदोलकर यांच्या सह उचगाव बेळगुंदीं आणि सुळगा यांच्या घरी देखील त्या भेटी देणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.