Saturday, January 11, 2025

/

मधुशाळा’ या अधिकृत आयुर्वेदिक दुकानाचे कुसमळीत उद्घाटन

 belgaum

‘मधुशाळा’ या अधिकृत आयुर्वेदिक दुकानाचा उद्घाटन समारंभ काल गुरुवारी बेळगाव जांबोटी रस्त्यावरील कुसमळी गावामध्ये पार पडला. मैरिया मेडलॅब्स या आयुर्वेदिक औषध उत्पादन कंपनीचे आउटलेट असलेल्या या दुकानात नैसर्गिक मध आणि त्याची आयुर्वेदिक उत्पादनेही उपलब्ध आहेत.

मधुशाला या नूतन आयुर्वेदिक दुकानाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा वनसंरक्षणाधिकारी (डीएफओ) हर्षा भानू आणि जांबोटीचे परिक्षेत्र वनसंरक्षणाधिकारी (आरएफओ) निर्वाणी उपस्थित होते. डीएफओ हर्षा भानू यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अभय फडके, श्री साखळकर, जांबोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश सडेकर, मैरिया मेडलॅब्सचे भागीदार डॉ श्रीनिवास पाटील सौरभ दोड्डणावर आणि अभिजीत भटकळ या मान्यवरांसह गावातील नागरिक उपस्थित होते. दुकानाच्या शुभारंभाबद्दल लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर यांनी मारिया मिडलॅब्सच्या सदस्यांना खास शुभेच्छा दिल्या.

मधुशाला अधिकृत आयुर्वेदिक दुकानात संदर्भात बेळगावला लाईव्हशी बोलताना मैरिया मेडलॅब्सचे भागीदार डॉ. श्रीनिवास पाटील यांनी कुसुमळी हे गाव बेळगाव -गोवा मार्गावर असल्यामुळे गोव्याला ये -जा करणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे.Honey

त्यांना स्थानिक मध आणि आयुर्वेदिक औषधाचा लाभ व्हावा. तसेच पर्यटकांच्या आरोग्याचे हित साधण्याबरोबरच बेळगावच्या आयुर्वेदिक ब्रँडचा देश विदेशात प्रसार व्हावा हा हे दुकान सुरू करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. या दुकानात नवीनता आहे, येथील प्रत्येक गोष्ट नवीन आहे. या दुकानामुळे स्थानिक मधाला ब्रँडिंग तर होणारच आहे. या खेरीज मधापासून तयार केलेली असंवारिष्ठ सारखी किण्वन आयुर्वेदिक उत्पादनं येथे उपलब्ध आहेत.

आयुर्वेदिक तेलापासून निर्मित साबण, विविध रामबाण वनौषधींची चूर्ण, अश्वगंधा कॅप्सूल, आवळा कॅप्सूल, शतावरी कॅप्सूल अशी विविध आयुर्वेदिक उत्पादने मधुशालामध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.