बेळगाव : बेळगाव अधिवेशनात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सन २०२२-२३ चा प्राथमिक अर्थसंकल्प सादर केला. बेळगाव मधील सुवर्णसौध येथे भरविण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ८,००१,.१३ कोटींचा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पात आपत्ती निवारणासाठी १३९६ कोटी, मनरेगा योजनेसाठी ७५० कोटी, ऊर्जा क्षेत्रातील इक्विटी खरेदीसाठी ५०० कोटी, विधानसभा निवडणुकीसाठी ३०० कोटी, राजीव गांधी गृहनिर्माण योजनेसाठी २५६ कोटी, रेल्वे योजनेसाठी २५० कोटी, पाणी योजनेसाठी २०० कोटी ५ मेगा वसतीगृहांसाठी २०० कोटी आणि बृहत बेंगळुरू महानगरपालिकेसाठी २००० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.