कामत गल्ली कॉर्नर जवळ आगीत भस्मसात झालेल्या त्या बॅटरी टायरच्या दुकानांना आणि लाकडी अड्ड्याला झालेल्या दुकादारांना तत्काळ नुकसाभरपाई दिली जाईल असे आश्वासन उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिली.
कामत गल्ली कॉर्नर जुन्या भाजी मार्केट समोरील बॅटरी टायरच्या दुकानांना त्यामागील असलेल्या लाकडाच्या अड्ड्याला आणि झाडांना शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान अचानक ही आग लागली आणि आगीचा भडका उडाला त्यानंतर आग इतक्या वेगाने पसरली की दोन बॅटरीची दुकाने, दोन टायरची दुकाने आणि त्यामधील असलेला लाकडी अड्डा आणि दोन झाडांना पेट घेतला.
रात्री सव्वा अकराच्या सुमारास घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या भिजवण्याचा प्रयत्न झाला मात्र तोपर्यंत आगीमध्ये दुकाने लाकडे आणि झाडे आगीत भस्मसात झाली होती.
मार्केट विभागाचे एसीपी एन वी बरमनी , अग्निशामक दलाच्या गाड्यासहआणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बनके यांनीही रात्री अकरा वाजता कार्यतत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना आग विझवण्यासाठी सूचना करत होते.
दरम्यान बेळगाव मध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात रहमानच मुख्यमंत्री बसवराज बोममाई यांच्या कानावर नुकसानीची माहिती देणार असून तात्काळ भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिले.
सदर आगीच्या भडक्यामध्ये दोन-चार दुकानांमधून आणि लाकडी अड्ड्याचा लाखोंचे नुकसान झालं असून नेमकं किती नुकसान झालेला आहे हा आकडा रविवारी समजणार आहे दरम्यान घटनास्थळी रात्री कामत गल्ली परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.